News About Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील हे मागील नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाला जरांगे पाटलांची समजूत काढण्यात यश आले. जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारला वेळ देण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी म्हटले
सरकारला 2 जानेवारीपर्यंत अल्टीमेटम
मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात आज चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची झालेली चर्चा यशस्वी ठरली. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला.