मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जन्म, बालपन, शिक्षण,अणखी,बारेच कहि वाचा या पोस्ट मधे | Who is Manoj Jarange Patil? Read more about birth, childhood, education, etc. in this post | Sikho Sikhao Blog 2023

मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जन्म्म्म, बालपन, शिक्षण,अणखी,बारेच कहि वाचा या पोस्ट मधे | Who is Manoj Jarange Patil? Read more about birth, childhood, education, etc. in this post | Sikho Sikhao Blog 2023

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मराठी 

मनोज जरांगे पाटील कोण आहेत?

संपूर्ण नाव :- मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil)

जन्मतारीख :- 1 August

पहिली स्थापना  :- Shivba Sanghatna

Mail id :- shivbasanghatna@gmail.com

Manoj jarange Patil

मनोज तसे मूळचे बीडच्या मातोरीचे.. पण काही वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगरात स्थायिक झाले. उदरनिर्वाहासाठी ते अंबड, जालना येथे एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आले आणि तिथेच राहू लागले. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं मनोज यांचं कुटुंब आहे. मनोज यांनी सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम केलं. पण पुढे त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापन केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरूवात केली. नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Jalna
Manoj Jarange Jalna

 

Manoj jarange Patil

समाज सेवेची आवड आणि बरेच काही:-

जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं. यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले… मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे. पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणारे म्हणूनही मनोज यांची ख्याती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या १० ते १५ वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करतायेत. आंदोलने करणे हा मनोज यांचा स्थायीभाव…

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

 

मनोज जरांगे पाटील यांनी समाजसेवेसाठी भरपूर आंदोलने केली

Manoj Jarange patil
Manoj Jarange patil

२०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं. शिवाय सहा दिवस उपोषणही केलं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं. आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी ३५ हून अधिक मोर्चे, आंदोलने केली. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक उपोषणही केली. 2012 ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं. 2013 ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं. अंबड तहसील कार्यालय समोर अकरा वेळा उपोषण केले. छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं.

Manoj Jaarange patil

Manoj jarange Patil

शेवटी मराठा समाजासाठी त्यांनी ऑगस्ट महिन्यात आमरण उपोषण धरले:-

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil Manoj Jarange Patil

समाजसेवक असलेले 41 वर्षीय मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यात उपोषणाला बसले पण त्याबाबत फारसं कोणाला माहितीच नव्हतं. पण जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मात्र हे उपोषण घराघरात पोहोचलं आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झटणारा नव्या चेहऱ्याची राज्यासह देशाला ओळख झाली. वय 41 वर्ष अन् व्यवसायानं समाजसेवक असलेले मनोज जरांगे 20 वर्षांपासून वेगवेगळी आंदोलन केलीत. तसेच, आतापर्यंत ते 20 मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेत. मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांच आंदोलन सुरू आसून आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, असा एल्गार केला.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

Manoj jarange Patil

सत्ताधारी,विरोधकांनी कितीही दडपण आणले तरीही आता माघार घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या हाताने फळांचा रस घेऊन उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे. या दिवसात मराठा समाजाला आरक्षण आणि सरसकट कुणबी प्रमाण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil

manoj Jarange patil
manoj Jarange Manoj

१४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी मेळावा घेणार

त्यासाठी सरकारनं एक समितीही स्थापन केली आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील राज्याचा दौरा करत असून त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी मेळावा घेणार असल्याचे जरांगे यांनी जाहिर केले आहे. पोलिसांच्या अंदाजाप्रमाने ऐतिहासिक ७५ लाखापेक्षा जास्त मराठे राज्यव्यापी मेळाव्यासाठी १४ आक्टोबरला अंतरवाली सराटी येथे एकत्र येतील.

manoj Jarange patil
manoj Jarange patil

 

manoj Jarange patil
manoj Jarange patil

 

manoj Jarange patil

येत्या १४ तारखेला अंतरवाली सराटीत होनार्या सभेच्या जागेसाठी गावकऱ्यांनी उभ्या पीकात JCB फिरवला आसून गावकर्यानी जागा आधी 85 एकर नंतर 100 एकर वरुन 150 केली आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी मराठा समाज व ओबीसी समाज वाद घालणार नाही व समोरासमोर येणार नाहीत असे जरांगे यांनी स्पष्ट केले. दिलेल्या मुदतीत शासनाने आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा आमरण उपोषण पुन्हा सुरू केले जाईल,असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. राज्यातील समाज बांधवांनी शांततेत आंदोलन करावे, कोठेही उद्रेक करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले. 🚩🚩🚩⛳⛳⛳ जयोस्तु मराठा

 

Manoj Jarange patil Photography: –

 

 

मनोज जरांगे पाटील यांचे SOCIAL मीडिया हँडल्स:-

टीप :- वरील सर्व माहिती आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणी पर्यंत नक्की पोहचवा.

🚩🚩🚩   !!!!! एक मराठा लाख मराठा !!!!!!     🚩🚩🚩

 

Leave a Comment