Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा 2रा हप्ता ‘या’ जमा होणार, काय आहे तारीख?

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना(Namo Shetkari Yojana) सुरू केली. ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या धरतीवर सुरू करण्यात आली. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात आला. यानंतर आता  लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा दुसरा हप्ता कधी येईल अशी अपेक्षा आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना काय आहे?

नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशी तीन टप्प्यांमध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. 

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार?Namo Shetkari Yojana 2nd installment Date

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला. यानंतर राज्यातील  या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची  प्रतीक्षा आहे. काही लोकप्रिय वेबसाईटच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता डिसेंबरच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला  जाऊ शकतो. म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी अपेक्षा तुम्ही करू शकता.

हे ही वाचा : तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार आहे? पहा संपूर्ण यादी :

राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य  सरकारचे प्रयत्न चालू आहेत. राज्यातील जे शेतकरी पीएम किसान  योजनेचा लाभ घेत आहेत अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. जे शेतकरी पीएम किसान  योजनेच्या लाभातून बाहेर झाले आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार नाही. Namo Shetkari Yojana 2nd installment 

हेही वाचा : कुसुम सोलर पंप योजना काय आहे?अर्ज कसा करावा?वाचा सविस्तर बातमी..!

राज्य शासनाच्या महत्त्वाच्या  योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या  खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तसेच सर्व  शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्ते लवकरच मिळणार आहेत. यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या(Namo Shetkari Yojana) लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment