Agri Irrigation Scheme : ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत,आत्ताच अर्ज करा

Agri Irrigation Scheme तुषार आणि ठिबक सिंचन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे.अनुदान योजना राज्य शासनाची एक महत्त्वाची योजना आहे.या योजनेचा आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे आणि घेतही आहेत.पण अजूनही ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला नसेल अश्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे.अनुसूचित जाती आणि जमाती च्या प्रवर्गातील राज्यातील शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत mahadbt पोर्टल वर अर्ज करावेत असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Prime Minister Agri Irrigation Scheme

राष्ट्रीय कृषी विकास योजनेनुसार तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन साठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 55% ते 45% अनुदान देण्यात येत आहे.अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.(Agri Irrigation Scheme २०२३ )

हेही वाचाकर्जमाफी योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,लवकरच लाभ मिळणार

तुषार आणि ठिबक सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. 7/12 8 अ उतारा
  2. अर्जदाराचे आधार कार्ड
  3. बँकेचे पासबुक
  4. आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  5. नोंद नसल्यास विहीर,बोर,शेततळे याविषयी स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडावे.
  6. अर्जदाराला सिंचनाची (बोर, विहीर) सोय असायला हवी.तसेच त्याची 7/12 वर नोंद असणे आवश्यक आहे.

ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी अर्ज कोठे करावा?

सर्वात अगोदर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जायला हवं.(Agri Irrigation Scheme Know How To Apply)

या योजनेत भाग घेण्यासाठी तालुक्याची कृषी कार्यालयाला भेट द्यावी किंवा कृषी अधिकारी,कृषी सहाय्यक ,कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा.शेतकर्यांनी अर्ज केल्यानंतर योजनेच्या लाभासाठी निवड झाल्यास एसएमएस द्वारे कळवण्यात येते.शेतामध्ये संच बसल्यानंतर पर्यावेक्षमार्फत जागेची तपासणी झाल्यानंतर जिल्हा स्थरावरून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सिंचन अनुदानाच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment