Motor Pump Scheme : विद्युत पंपसंच खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळणार

Motor Pump Scheme

Motor Pump Scheme : भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे देशातील खूप नागरिकांचा व्यवसाय शेतीवरती अवलंबून आहे. शेती म्हंटली की सिंचनाची सुविधा आलीच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे सुविधा असेल, त्यांचं उत्पन्नसुद्धा वाढीव असणारच हीच गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी शासनाकडून विविध अनुदान योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकीच महत्वाची म्हण ली जाणारी सिंचन योजना म्हणजे विद्युत पंप अनुदान योजना आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Motor Pump Scheme
Motor Pump Scheme

इलेक्ट्रिक मोटरपंप संच अनुदान योजना Motor Pump Scheme

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक मदत मिळावी यासाठी शासन सतत नवनवीन योजना राबवत असतात. शेतीसाठी जर बारामाही सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली, तर शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्न घेता येईल. हीच घोष बाळगून शासनाकडून विद्युत पंप अनुदान योजना किंवा इलेक्ट्रिक मोटर पंप संच अनुदान योजना सुरू करण्यात आली.

ही योजना महाराष्ट्र शासनाकडून विशेष शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटार पंप संच खरेदीसाठी 45 ते 50% पर्यंत अनुदान दिल जात. ही योजना पोखरा आणि महाडीबीटी या दोन्ही माध्यमातून राबविले जाते, त्यामुळे पोखराअंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज करू शकतील किंवा महाडीबीटी अंतर्गत सर्व गावातील शेतकरी या साठी अर्ज करू शकतील.

अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Documents for Motor Pump Scheme

● शेतकऱ्यांचा आधार कार्ड
● जमिनीचा सातबारा उतारा
● आठ अ उतारा
● बँक पासबुक झेरॉक्स
● जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
● इतर कागदपत्र (निवड झाल्यानंतर)

शासनाकडून करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर विद्युत पंप खरेदी करावी लागेल. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अनुदान  मिळवता येईल. या योजनेच्या शासनाकडून काही अटी व नियम ठेवण्यात आलेले आहेत,जश्याप्रकारे यापूर्वी शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा, शेतकरी सरकारी नोकरदार नसावा इत्यादी विविध अटी असतील.

Motor Pump Scheme

अनुदान रक्कम किती ? How much is the grant amount for Motor Pump Scheme ?

इलेक्ट्रिक विद्युत पंप किंवा मोटारपंप संच खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50% पर्यंत अनुदान देण्यात येईल. अनुदानाची रक्कम खरेदी वस्तूच्या जास्तीत जास्त 50 टक्के किंवा 15 हजार रुपयापर्यंत इतकी असेल. जातीचा दाखला असल्यास अर्जदारांना सवलतीमध्ये वाढीव 5% अनुदान देण्यात येईल.

🌐 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आता मिळवा तुमच्या शेतमालाचे बाजारभाव एका क्लिक वर!

Leave a Comment