Pashudhan Bima Yojana Maharashtra 2023 : जनावरांच्या सुरक्षासाठी आता शासनाकडून फक्त 3 रुपयांत पशुधन विमा योजना सुरु, जाणून घ्या !

Pashudhan Bima Yojana : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजना व सवलती देण्यात येतात. यावर्षी नव्यानं सुरुवात करण्यात आलेली 1 रुपयात पिक विमा योजना राज्यभरात खूप प्रसिद्ध झाली आणि याचा फायदासुध्दा राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना झाला. याच्यावर आता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना पशुविमा दिला जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर पशुपालन केलं जातं. हीच गोष्ट लक्षात घेता राज्य शासनाकडून ही विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पशुधन विमा योजना महाराष्ट्र 2023 Pashudhan Bima Yojana Maharashtra 2023

शेतीव्यवसाय करत असताना शेतकऱ्यांकडून शेती सोबत आपल्या जनावरांची काळजी घेणंसुध्दा तितकंच महत्त्वाच आहे. त्यामुळे आता राज्य शासनाकडून जनावरांच्या सुरक्षितते साठी नवीन पशुविमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. Pashudhan Bima Yojana Maharashtra 2023 योजनेनुसार शेतकऱ्यांना एका जनावराचा विमा करण्या साठी फक्त 3 रुपये मोजावे लागणार आहेत. या योजनेचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडून तयार केला जात असून लवकरच शेतकऱ्यांसाठी ही योजना अमलात येईल.

पशुधनाचे स्थूल मूल्य 93 हजार 169 कोटी रुपय आहे. हाच पशुधन संवर्धित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रस्ताव तयार केल्यानंतर मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळा समोर ठेवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळा समोर हा पशुधन विमा योजना Pashudhan Bima Yojana Maharashtra 2023 प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.

Electricity Latest important News – आता लाईट बिल होणार बंद काय आहे संपूर्ण बातमी लगेच जाऊन पहा

पशुधन विमा योजना केंद्र-राज्यशासन भार

सध्याच्या स्थितीत केंद्रशासनाच्या मदतीने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पशुविमा योजना राबविण्यात येते. त्यामुळेच या योजनेत हप्त्याच्या 40 टक्के रक्कम किंवा भार केंद्रावर असून 30 टक्के भार राज्यावर आहे व उर्वरित 30 टक्के भार लाभार्थ्यावर आहे. सरकारच्या नवीन योजनेत ही गोष्ट संपूर्णतः राज्य सरकार आणि लाभार्थ्यावर समान प्रमाणात विभागण्यात येईल.

राज्य सरकारच्या प्रस्तावित योजनेत 1.5 लाख जनावरांची मर्यादा नसेल. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त पाच जनावरांचाच विमा या योजनेंतर्गत करता येईल.या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी खूप मदत होईल. विमा योजनेमुळे जनावरांचचा मृत्यू किंवा आजारांमुळे शेतकऱ्यांना होणारे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल.

पशुधन विमा योजना वैशिष्ट्य

• पशुविमा शेतकर्‍यांना खूपच कमी दरात देण्यात येईल, एका जनावरांचा विमा करण्याचे शेतकऱ्यांना फक्त 3 रुपये लागतील.

• या योजनेत 1.5 लाख जनावरांची मर्यादा नसेल.

• एका शेतकऱ्याना जास्तीत जास्त त्यांच्या 5 जनावरांचा पशु विमा करता येईल.

• योजनेचा खर्च शासन व लाभार्थ्यांवर समान प्रमाणात देण्यात येईल.

पहिला हफ्ता यादिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा | Namo Shetkari Yojana Installment Date

पशुधन विमा योजना लाभ

• शासनाच्या या निर्णया मुळे शेतकऱ्यांना त्याच्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी मदत होईल.

• विमा योजनां मुळे पशुधनाच्या मृत्यू किंवा आजारांतस्व होणार आर्थिक नुकसान कमी होईल.

Frequently Asked Questions (FAQ) for Pashudhan Bima Yojana Maharashtra 2023

Q.1 पशुसंवर्धन योजना म्हणजे काय ?
Ans. हि ग्रामीण कुक्कुटपालन उद्योजकता, मेंढ्या, शेळी, पालन आणि सायलेज उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना आहे.

Q.2 राष्ट्रीय पशुधन अभियान कधी सुरू झाले?
Ans. राष्ट्रीय पशुधन अभियान हा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. 2014-15 पासून सुरू झाली आहे

Pashudhan Bima Yojana Maharashtra 2023

Leave a Comment