Namo Shetkari Yojana Installment Date-पहिला हफ्ता यादिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा | Namo Shetkari Yojana Installment Date

Namo Shetkari Yojana Installment Date:- अखेर राज्यातील सर्व शेतकरी या योजनेची वाट पाहत होते ती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हफ्ता जमा करण्यात येणार आहे.

Namo Shetkari Yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Namo Shetkari Samman Yojana Maharashtra :

शेतकरी ज्या योजनेची आतुरतेने वाट पाहत होते आणि या योजनेचा पहिला हफ्ता कधी जमा होणार याची चौकशी करत होते अखेर त्या योजनेला आता मुहूर्त मिळाला आहे.शेतकऱ्यांना पहिला हफ्ता देण्यासाठी १७२० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.पीएम किसान योजनेशी संलग्न असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने मुळे महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना आता वार्षिक १२००० रु. दिले जाणार आहेत. आणि आज नमो शेतकरी सन्मान निधी योजने साठी पहिला हफ्ता जमा होण्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे.

👉 Namo Shetkari Yojana Installment List गावानुसार यादी येथे पाहा 👈🏻

महाराष्ट्र राज्य कृषी संवर्धन ,मत्स्यविकास विभाग कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शासन निर्णय मध्ये एप्रिल २०२३ ते जुलै २०२३ साठीचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता वितरीत केला जाणार आहे. या साठी राज्य सरकारने आता  पूर्ण तयारी केलेली असून पीएम किसान सन्मान योजनेच्या धरतीवर आता नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे डीबीटी च्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.

Namo Shetkari Yojana 1st Installment Date :

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.यानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित केला असून यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि राज्याचे सर्वच मंत्रिमंडळ उपस्थित असणार आहे.

👉 नमो Shetkari Yojana  तुमचे नाव येथे जाऊन चेक करा 👈🏻

पीएम किसान सन्मान योजनेसाठी 14वा हफ्ता राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना देण्यात आला होता परंतु आता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दूर केल्या मुळे आता १५ वा हफ्ता हा ९३ लाख शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेआहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हफ्ता या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने सुमारे १७२० कोटी रु.निधी वितरीत केला आहे.

🛑 नमो शेतकरी योजनेचा GR पाहण्यासाठी

 

Daily bazar bhav (Bajarbhav) आणी नवीन योजना अपडेटसाठी लगेच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👇

Join Whatsapp Group

Leave a Comment