News About Maratha Aarakshan : आमदार सर्वश्री कैलासराव पाटील, डॉ.राहुल पाटील, निलेश लंके, राजूभैय्या नवघरे मराठा_आरक्षण मागणीसाठी थेट राजभवनावर

Manoj Jarange Patil News

News About Maratha Aarakshan
News About Maratha Aarakshan

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी श्री. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत. अन्नाचा कणही न घेण्याची प्रतिज्ञा त्यांनी समाजासमोर घेतली आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. तरीही सरकारने अजून ठोस पाऊल उचलले नाही. मराठा बांधवांच्या संयमाची अग्नीपरिक्षा घेतली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न काही ठिकाणी निर्माण होत आहे. राज्यभर आंदोलन सुरू असतानाही जबाबदार असणारे सरकार इतकं स्वस्थ कसे काय बसू शकते, हे आकलनाच्या पलीकडील आहे. समाजाचा आक्रोश पाहता तातडीने पावले उचलली पाहिजेत.
मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याची सद्बुद्धी पूज्य बापुजीनी या सरकारला द्यावी, असे साकडे घालत आज मुंबई येथील गांधी उद्यानातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आम्ही सर्वपक्षीय मराठा आमदारांनी लाक्षणिक उपोषण केले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जन्म, बालपन, शिक्षण,अणखी,बारेच कहि वाचा या पोस्ट मधे | Who is Manoj Jarange Patil? 

या उपोषणानंतर राजभवन येथे महामहीम राज्यपाल मा. रमेश जी बैस यांची सर्व आमदारांनी भेट घेतली. मा. राज्यपाल महोदयांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७४ खंड (१) नुसार प्राप्त अधिकारातून त्यांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे असे निवेदन दिले व महाराष्ट्रात निर्माण झालेल्या स्थिती प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली.
यावेळी सहकारी आमदार सर्वश्री कैलासराव पाटील, डॉ.राहुल पाटील, निलेश लंके, राजूभैय्या नवघरे, यशवंत माने, माधवराव पाटील जवळगावकर, राजेश पाटील, बाळासाहेब आजबे, बाबासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.

Join Whatsapp Group

Leave a Comment