The price of basmati rice will increase 2023 | बासमती तांदुळाचे भाव वाढणार | तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल एवढा मिळणार भाव वाचा संपूर्ण बातमी पहा

बासमती तांदुळाचे भाव वाढणार | तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल एवढा मिळणार भाव वाचा संपूर्ण बातमी

The price of basmati rice will increase.

केंद्र सरकार घटवणार बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य
केंद्र सरकारकडून बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य घटविले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी तांदूळ निर्यातदारांसोबत झालेल्या बैठकीत बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य प्रति टन 1,200 डॉलर्सवरून प्रति टन 950 डॉलर्स करण्यावर सहमती दर्शवली आहे.
केंद्र सरकारकडून 25 ऑगस्ट रोजी बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य प्रति टन 1200 डॉलर्स निश्चित करण्यात आले होते. मात्र, निर्यातदारांकडून सातत्याने किमान निर्यात मूल्य घटविण्याची मागणी केली जात होती. त्यादृष्टीने केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा देखील केला जात होता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Rice Bajarbhav Today 2023 – तांदुळाचे भाव आणखी वाढणार , काय आहे संपूर्ण बातमी आता लगेच जाऊन पहा

उच्च निर्यात किंमतीमुळे भारतीय बासमती तांदळाची जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता संपत चालली आहे. त्यामुळे भारतीय बासमती तांदळाच्या निर्यातीत घसरण होत आहे, असे निर्यातदारांकडून सांगण्यात येत होते.
दरम्यान, केंद्र सरकारकडून लवकरच बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत कमी करण्यासंदर्भातील निर्णयासंबंधीची अधिसूचना काढली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तांदूळ निर्यातदारांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय निर्यातदारांकडून खरेदी वाढणार असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल.

Join Whatsapp Group

Leave a Comment