Sheli palan anudan yojana:शेळीपालन व्यवसायासाठी मिळणार 75% अनुदान,ऑनलाईन अर्ज सुरू

Sheli palan anudan yojana:नमस्कार शेतकरी मित्रांनो,महाराष्ट्र राज्यामध्ये शेळीपालन,पशुपालन हे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात.या व्यवसायाची व्याप्ती अजून वाढताना दिसत आहे.राज्य शासन शेळीपालन, मेंढीपालन ,पशुपालन अश्या व्यवसाय करणाऱ्या शेतकरयांना आर्थिक मदत म्हणून जवळ जवळ 75% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.याचा तरुण उद्योजक शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे.शासनाच्या या योजनेचा प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना लाभ मिळणार आहे.आजच्या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शेळीपालन योजना आवश्यक पात्रता Sheli palan anudan yojana Maharashtra 2023

 1. ज्या शेतकऱ्याच्या नावावर 2 हेक्टर किंवा 5 हेक्टर पेक्षा कमी जमीन नावावर असेल असे शेतकरी या योजनेस पात्र आहेत.
 2. जर एखाद्या कुटुंबात शेतकरी महिला ही कुटुंब प्रमुख असेल तर तिला प्राधान्य देण्यात येणार आहे.
 3. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेचा प्रामुख्याने लाभ घेता येणार आहे.
 4. बचत गट चालवणाऱ्या महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे.

शेळी पालन येजनेसाठी आवश्यक पात्रता

1.अर्जदाराचे आधार कार्ड
2.रहिवासी प्रमाणपत्र
3.जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
4.पासपोर्ट फोटो
5.उत्पन्नाचा दाखला
6.बँकेचे पासबुक
7.पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र(Sheli palan anudan yojana Maharashtra 2023)

शेळी पालन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 1. या योजनेच्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला जवळच्या CSC केंद्रावर जाऊन अर्ज करायचं आहे.
 2. या योजनेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
 3. अर्ज करताना माहिती काळजी पूर्वक भरावी.
 4. माहिती अपूर्ण असल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.
 5. अर्ज करताना सर्व कागदपत्रे काळजपूर्वक अपलोड करावी.
 6. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट आपल्याकडे ठेवावी.
 7. ऑनलाइन अर्ज करताना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा.

शेळी पालन व्यवसायासाठी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment