PRADHANMANTRI SURAKSHA BIMA YOJANA-: आपल्या देशाचे केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते त्यामधील येक महत्वाची योजना म्हणजे ही योजना आज आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या केंद्र शासनाच्या एका महत्त्वाच्या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.
मित्रांनो सर्वसामान्य व्यक्तीला आपला विमा काढायचा म्हटल्यास त्या विम्याचे हप्ते त्या व्यक्तीला परवडत नाहीत. व्यक्ती त्यामुळे बरेच नागरिक आपला विमा काढत नाहीत व याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात बसतो कारण कोणताही अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांच्या दवाखान्याचा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे अशावेळी विमा न काढल्याचा मोठ्या प्रमाणात फटका नागरिकांना बसत असतो.
आज आपण याच एका महत्त्वाच्या योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत ही योजना दारिद्र रेषेखालील म्हणजेच ज्यांचे उत्पन्न कमी आहे यांच्यासाठी खूप उपयोगाची आहे ही योजना केंद्र सरकारच्या मार्फत राबवण्यात येते.
या योजनेची सुरुवात 2015 यावर्षी भारत सरकारने केली होती. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेअंतर्गत नागरिकांना दोन लाखांपर्यंतचा अपघाती विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेसाठी वयाची अट अठरा वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत ठेवण्यात आली आहे. यातून फक्त वीस रुपयात नागरिकांना दोन लाखांचा विमा दिला जातो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विमा काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत.
हे संरक्षण वीस रुपयात एका वर्षासाठी दिले जाते त्याच्या हप्त्याची रक्कम नागरिकांचा खात्यातून कापून घेतली जाते व त्यानंतर अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास विमाधारकाच्या कुटुंबीयांना दोन लाखांची रक्कम दिली जाते.
2015 यावर्षी या योजनेची सुरुवात केली होती तेव्हा विम्याची रक्कम बारा रुपये इतकी ठेवण्यात आली होती व त्यानंतर 2022 पासून या हप्त्याची रक्कम वीस रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामान्य नागरिकांना म्हणजेच ज्यांचे उत्पन्न खूप कमी आहे अशा लोकांना विमा संरक्षण घेता यावे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना या योजनेसाठी अर्ज करताना सर्वप्रथम नागरिकांना कोणत्याही बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल. नागरिकांनी आपल्या जवळच्या बँकेला म्हणजेच आपले ज्या बँकेत खाते आहे त्याच बँकेत जाऊन या योजनेची चौकशी करायची आहे. आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.
या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे कारण मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांकडून विमा पॉलिसी काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना त्या कंपन्यांचे हप्ते परवडत नाही त्यामुळे नागरिक त्या विम्या पासून वंचित राहतात व काही अपघात किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याचा खर्च नागरिकांना परवडण्यासारखा नसतो त्यामुळे ही योजना नागरिकांना खूप फायद्याची ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट देऊन या योजनेची चौकशी करून या योजनेचा नक्की लाभ घ्या.