News About Maratha Aarakshan 2023 – Manoj Jarange Patil

News About Maratha Aarakshan 2023

News About Maratha Aarakshan 2023 News About Maratha Aarakshan 2023 News About Maratha Aarakshan 2023

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याशी काल राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेतील मुद्यांवर आज तातडीने बैठक घेऊन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सविस्तर चर्चा केली. ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. विभागातील कुणबी नोंदी तपासणीच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

News About Maratha Aarakshan 2023

मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जन्म, बालपन, शिक्षण,अणखी,बारेच कहि वाचा या पोस्ट मधे | Who is Manoj Jarange Patil? Read more about birth, childhood, education, etc. in this post | Sikho Sikhao Blog 2023

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. या कामाच्या संनियंत्रणासाठी मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याबाबत संनियंत्रण करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

News About Maratha Aarakshan 2023

Join Whatsapp Group

Leave a Comment