Nano DAP 2023 | लवकरच नैसर्गिक युरिया येणार अमितशहा यांच्याकडून नवीन प्लांटचे उदघाटन – काय आहे संपूर्ण बातमी आता लगेच जाऊन पहा

Nano DAP 2023 | लवकरच नैसर्गिक युरिया येणार अमितशहा यांच्याकडून नवीन प्लांटचे उदघाटन – काय आहे संपूर्ण बातमी आता लगेच जाऊन पहा

Nano DAP 2023: – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी गांधीनगरमधील कलोल येथे देशातील पहिल्या नॅनो लिक्विड डीएपी प्लांटचे उद्घाटन केले. या प्लांटची उभारणी इफकोकडून करण्यात आली आहे.
सहकारमंत्री शाह म्हणाले की, दहा वर्षांनंतर जेव्हा कृषी क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रयोगांची यादी बनवली जाईल, त्यावेळी त्यात इफकोच्या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा अग्रक्रमाने समावेश केला जाईल. शहा म्हणाले की, युरियाचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. इफकोचे कलोल युनिट ग्रीन टेक्नॉलॉजीवर आधारित नॅनो डीएपीच्या सुमारे 42 लाख बाटल्यांचे उत्पादन करेल, ज्याचा थेट शेतकऱ्यांना फायदा होईल.
शहा म्हणाले की, नैना युरियाची फवारणी जमिनीवर नाही, तर वनस्पतींवर केली जाते. त्यामुळे जमिनीतील गांडुळे मरण्याची आणि नैसर्गिक घटकांचा नाश होण्याची शक्यता जवळपास संपून जाते. सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांनी इफकोच्या सहकार्याने नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या वापरास चालना दिल्यास आपण लवकरच नैसर्गिक शेतीच्या दिशेने प्रगती करू.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Join Whatsapp Group

Leave a Comment