Lek Ladki Yojana Maharashtra 2023
लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्या मध्ये नवीन स्वरूपात सुरू करण्यात आलेली आहे लवकरच या संदर्भातील GR शासन निर्णय जाहीर करण्यात येईल. लेक लाडकी योजना काय आहे. आपण पाहूया.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात मुलीच्या शिक्षणाला चालना मिळण्यासाठी एक योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. त्या योजनेच नाव म्हणजे (lek ladki yojana) लेक लाडकी योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पात्र मुलींना 75,000 रुपयापर्यंत शिक्षणासाठी आर्थिक (Economic) मदत केली जाणार आहे. मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ही योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
Lek Ladki Yojana Maharashtra 2023 लेक लाडकी योजना Overview लेक लाडकी योजना पात्रता
• लाभार्थी मुलगी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असायला पाहिजे.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलीच्या परिवारातील रेशनकार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचा असावा.
• फक्त दुर्बल अणि वंचित घटकातील लाभार्थी मुलींनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
• 18 वर्ष पूर्ण झाल्या नंतर पुढील शिक्षणासाठी सरकार कडून 75,000/- मिळवायचे असल्यास, सर्व शैक्षणिक कागदपत्रं असणे अनिवार्य आहे.
Lek Ladki Yojana Maharashtra 2023 आर्थिक सहायता रक्कम (Amount)
लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी लहानपणापासून ते वयाच्या 18 व्या वर्षा पर्यंत सरकारकडून खालील प्रमाणे आर्थिक मदत करण्यात येते.
1) मुलीच्या जन्मा नंतर पात्र कुटुंबाला 5,000/- रु. इतकी आर्थिक मदत म्हणून करण्यात येईल.
2) मुलगी मोठी झाल्यानंतर इ. पहिली मध्ये (वर्ग ०१) शिक्षणासाठी जायला लागल्या नंतर शासनाकडून 5,000/- रु. आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
3) यानंतर मुलगी इ. 6 वी मध्ये शिक्षण घेत असल्यास शासनाकडून 6,000/- रु. देण्यात येतील.
4) जर मुलगी इ. 11 वी मध्ये शिक्षण घेत असेल, तर त्यासाठी शासनाकडून 8,000 रु. देण्यात येतील.
5) मुलीच्या 18 वर्षे पूर्ण झाल्या नंतर सरकारकडून मुलीच्या शिक्षणासाठी 75,000/- रु. देण्यात येतील.
Lek Ladki Yojana Maharashtra 2023 लेक लाडकी योजना कागदपत्रे (Documents)
• आधारकार्ड
• मुलीचा जन्माचा पुरावा
• रहिवाशी प्रमाणपत्र
• शैक्षणिक कागदपत्रं
• कौटुंबिक रेशनकार्ड (पिवळा किंवा केशरी)
Lek Ladki Yojana Maharashtra 2023 लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाईट
महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसाठी अद्याप अर्ज कसा करावा ? या संदर्भातील सविस्तर माहिती दिली नसल्यामुळे, लेक लाडकी योजना वेबसाईट किंवा पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आलेला नाही. आम्हाला या योजने संदर्भातील माहिती किंवा नवीन काही अपडेट करतात आमच्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा वेबसाईटवरती आम्ही तुम्हाला कळवू देण्यात येईल.