Kanda Bajarbhav Today 2023- लासलगावात कांद्याला तब्बल एवढा रुपये प्रतिक्विंटल मिळाला भाव
Kanda Bajarbhav Today 2023: – कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव, जि. नाशिक श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवार, लासलगांव लासलगावात कांद्याला 4,141 रुपये प्रतिक्विंटलचा भाव
आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याचा कमाल घाऊक भाव 4,141 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विंचूर बाजारपेठेत कांद्याला कमाल 4,199 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत असून कांद्याचा सरासरी भाव 3,900 रुपये प्रति क्विंटल आहे. राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात तेजी बघायला मिळतेय.
महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असून देशाच्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचे योगदान 43 टक्के आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याच्या उत्पादनाचा आणि बाजारपेठांमधील भावाचा परिणाम देशभरातील कांद्याच्या बाजारपेठांमधील भावावर बघायला मिळतो.