anganwadi bharti : अंगणवाडी सेविका [मदतनीस] पदाची मेगाभारती : लवकर अर्ज करा

anganwadi bharti 2024 

anganwadi bharti-:   नमस्कार बारावी पास असणाऱ्या महिलांसाठी एक शासकीय नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सांगली जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडी सेविका पदांच्या रिक्त पदांची भरती करून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज आठ जानेवारी 2024 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जिल्हा सांगली येथे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमा करायचे आहेत. व ही मुदत संपल्यावर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची दक्षता अर्ज करण्यापूर्वी पात्र व इच्छुक उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज जमा करायचा आहे.

यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच अर्ज करताना बारावी पास असण्याची गुणपत्रिका त्याची सत्यप्रत जोडणी आवश्यक आहे. अर्ज करणारा अर्जदार सांगली जिल्ह्यातील असावा अशी अट घालण्यात आली आहे त्यासाठी उमेदवाराकडे तेथील रहिवासी प्रमाणपत्र किंवा कोणताही रहिवासी पुरावा असणे म्हणजेच उदाहरणात ओळखपत्र किंवा आधार कार्ड याची सत्यप्रत उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या कागदपत्रांसोबत जोडणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे.

ज्यांचा विवाह झाला आहे त्यांनी आपल्या सासरचा रहिवासी पुरावा जोडावा. या पदासाठी वयाचे अट 18 वर्षे ते 35 वर्ष तसेच विधवा उमेदवारांसाठी चाळीस वर्षाची अट काढण्यात आली आहे.

उमेदवाराला दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास या पदासाठी अर्ज करता येणार नाही याची दक्षता घेऊनच आपला अर्ज जमा करायचा आहे. उमेदवाराला अर्ज करताना किमान एका भाषेचे चांगल्या पद्धतीने ज्ञान असणे आवश्यक आहे.

अंगणवाडी सेविका पद हे स्थानिक असल्यामुळे उमेदवार स्थानिक असल्यास त्याला जास्त प्राधान्य दिले जाईल याची नोंद उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी घ्यायची आहे व त्यानंतरच आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे.

कमीत कमी कोणत्याही शासकीय कामाचा दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्याला जास्त प्राधान्य दिले जाईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

या पदाची निवड प्रक्रिया तुम्हाला बारावीत मिळालेल्या गुणांवर केली जाईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

उमेदवाराने अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. हे पद मानधनी स्वरूपाचे आहे त्यामुळे या पदासाठी बदली किंवा सेवानिवृत्ती किंवा वेतन वाढ या प्रकारची कोणतीही सवलत मिळणार नाही. अर्जदाराने संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरावा.

अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

 

 वरील माहिती उपयुक्त वाटल्यास ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद! 

Leave a Comment